Tushar Bhutkar
शब्द हेच जीवन
Featured post
नवचैतन्याचे:-चारोळी
तुषार चेहऱ्यावर हास्य असावे आसू दूर राहावे मनाच्या अंतरंगात नवचैतन्याचे वारे वाहावेत...! ©®"शब्दसखा" तुषार भुतकर
Wednesday, 15 September 2021
Saturday, 11 September 2021
नव्या युगाची कहाणी
Friday, 10 September 2021
जगणं स्वस्त आहे!
संघर्ष कोणाला चुकलाय ओ...! मी असो या तुम्ही, प्रत्येकजण! त्यात नुसत्या संकटांना वैतागून धीर सोडून आत्महत्या करणं हे चुकीच आहे! काही म्हणतील, हे काय बोलायला लागलंय, तुला काय कळणार काही ठिकाणी टेन्शन घ्यावं लागतं! तू तर ते कधी घेत नाही! येत मला पण टेन्शन... पण मला आयुष्यात पडलेल्या प्रश्नाच उत्तर, संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग, प्रत्येक ठिकाणी मी नेहमी मार्ग शोधतो पण पळवाट नाही! पळवाट प्रत्येक ठिकाणी, शेवटी निर्णय हा आपल्या हाती असतो ना!, की आपल्याला मार्ग शोधायचा की पळवाट! असुद्या, आपल्याला जास्त झंजट करून घ्यायला नाही आवडत! होतंय ना... होऊद्या! जे व्हईल ते! डोक्याला ताण घ्यायचा बी नाही अन् द्यायचा नाही!!
जीवनात आलो म्हणजे संघर्ष, कष्ट, संकट, मरण या गोष्टी कुणाला चुकल्याय का ओ...? मग, आपण पटकन या गोष्टींशी लढाई द्यायचं सोडून हार मानून मोकळं होतो! अस का, मरण स्वस्त नसत...! जरी ते आपल्याला स्वस्त वाटत असेल पण त्याच्याइतक महाग काहीच नसत! जगणं महाग वाटत पण जगण्याइतक सोप्प काही नसतं! तुम्हाला गोंधळात टाकल्यागत वाटत ना मी... सांगतो, जीवनात प्रत्येक क्षणाला नवं काहीतरी शिका! वाईट घडलं ना सकारात्मक विचार करून त्या वाईट गोष्टीच आपल्या आयुष्यात का आली? तिने आपल्याला काय नवीन शिकवलं...? आपली चूक होती का? समोरच्याची होती का? पण आपलं खरं करायला कधी जाऊ नका! नेहमी समोरच्याच्या विचारांचा आदर करा! तेव्हा जगणं सोप्प होईल आणि हा, नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन जगा! आनंदाने राहायला शिका! आनंदाने कस राहायचं यावर मी वेगळा लेख लिहील नंतर.
जेव्हा आपण दुःखाला कवटाळून जगतो ना तेव्हा मरण स्वस्त वाटायला लागतं! आपण ना एखाद्या ठिकाणी स्वतःला चुकीच समजत बसलो ना... आपण एखाद्यााकडून खूप अपेक्षा ठेवतो... जीवनात असच झालं पाहिजे तसच व्हायला हवं होत पण होत नाही आणि आपण स्वतःला एकट पाडून घेतो! आणि, इथेच आपल्याला मरण स्वस्त वाटायला लागतं आणि त्यातून येतो मनात आत्महत्याचा विचार... पण अशा वेळेला आपण आपल्याजवळ एक तरी व्यक्ती पाहिजे की, जिच्याशी आपल्याला आपल्या मनातलं बोलता यायला पाहिजे! मन मोकळं करता आलं पाहिजे! आपलं एकटपन त्याच्याशी बोलून दूर गेलं पाहिजे! अशी एक तरी व्यक्ती हवीच! फरक नाही की ती व्यक्ती मुलगा असो या मुलगी पण पाहिजेच!
जीवनात "हो" ला "हो" म्हणणारे भरपूर भेटतील पण "चुकीला चूक" म्हणणारे पण हवेत! पण प्रत्येक वेळेला चूक म्हणणारे नको! भेटतील असंख्य पण संख्यात मोजणारे मन मोकळे करून घेणारे पाहिजेत! अहो, जीवनाची वाट हो वेडीवाकडी आणि बिकट-किचकटच! झंजटमारी लैच डोक्याला! पण शांत, संयम, चिकाटी , जिद्द , या गोष्टी संकट, संघर्ष यांना लढायला आणि कष्ट करून जगायला लावतो! हीच जीवनाची वाट आहे! बोललो ना तुम्हाला जगणं महाग वाटत पण सोप्प आहे! फक्त लढत राहा स्वप्न पूर्ण करण्यासाठी! जगणं सोप्प आहे फक्त जीवनात स्वतःला आनंदी ठेवा म्हणजे इतरांना आनंद देता येईल! इतरांना जेवढा आनंद देतान त्यापेक्षा जास्त आनंद तुम्हाला भेटेल! कधीही कोणतीही चिंता लाभो ती व्यक्त करायला शिका! घोटमळत जगू नका! मरण स्वस्त असत पण मेल्यावर पाठीमागे जे काय दुःख देऊन जात;ते काय परवडणार नसत! त्यामुळे नेहमी जगण्याचा आनंद घेत रहा!
©®शब्दसखा तुषार भुतकर
दि.७.७.२१
वेळ:२१:३०
#१७३
Thursday, 8 March 2018
माझ्या दृष्टिकोनातून ती स्त्री..
!मला माझ्या आयुष्यात सर्वात प्रेरणादायी एक स्त्री आहे.
आपल्या निर्णयात किती ठाम असाव हे एका स्त्रीकडूनच कळत..!आपलं काम किती चोखपणे करायचं हे पण एक स्त्रीकडूनच कळतं..!प्रत्येकात कशा पद्धतीने मिसळून मिळून राहायचं हे एका स्त्रीकडून कळतं;कारण नात काय असत हे ती चांगल्या पद्धतीने जाणते..!कदाचित वाचणार्यापैकी काहींना याविरोधी रूप मिळालं असेल.अच्छा ठिकेय तर त्याच कारण अस तिनी तुम्हाला समजून घेतलेलं असत पण तुम्ही नाही..!मान्य नाही करणार पण हे वास्तविक सत्य आहे दोस्त..!
जर तुम्ही तिचा आदर केला ना ती तुमचा खूप आदर करते.हे स्त्रीच्या व्यक्तीमत्वाच वैशिष्ट्य आहे.तुम्ही सर्व तुमच्या आईचा,बहिणीचा आदर करतात...बरोबरेय ना..!त्याबदल्यात तुम्हाला आदर मिळतो..मग मला हेच तर सांगायचंय की,प्रत्येक स्त्रीचा आदर करा भले ही तिची वागणूक आपल्या विरोधी असेल.. ती विरोधी जेव्हा वाटेनं तेव्हा तुम्ही तिचा अनादर करतात..!
हा जर तुम्ही आदर करून,समजून घेऊन बी समोरचा तुमचा अनादर करत असेल ना तिचा आदर करून;तिला तुमची किंमत कळेपर्यंत दूर व्हा..!मन नाही म्हणेन पण तुम्ही थोडं दूर गेले की समोरच्याला महत्व समजेन...पण शेवटी असे सांगावेसे वाटते,आयुष्यात स्त्रीचा खूप आदर करा एक दिवस फार मोठे व्यक्ती बनशाल. जसे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले आणि असे अनेक आहे की ज्यांनी स्त्रीचा आदर केला म्हणून आज इतिहास त्यांचा आदर करतो.आणखी एक स्त्रीची ज्या पुस्तकात विटंबना केली असेल;जसे की ती फक्त कामाची वस्तूय, तिचा फक्त उपयोग करावा(इथं मी काही शब्द बंधन असल्याने लिहू शकत नाही कारण;मला असं वाटतं की मी स्त्रीची विटंबना करेल..) असे पुस्तक पहिल्यांदी फेकून द्या..!स्त्रीच महत्व काय आहे यासाठी मी पुढील एक-दोन वर्षात "तू चुकतीस कुठं..?" पुस्तक लिहायला सुरू कारणारेय.. त्यात आशा पद्धतीने लिहिणार की,ती कधी स्वार्थी नसते अन कधी धोका देत नसते..!आणि महिलादिनाच्या माझ्यातर्फे सर्व आदरणीय स्त्री वर्गाला ही भेट..
धन्यवाद..!©तुषार भुतकर