Featured post

नवचैतन्याचे:-चारोळी

तुषार चेहऱ्यावर हास्य असावे आसू दूर राहावे मनाच्या अंतरंगात नवचैतन्याचे वारे वाहावेत...! ©®"शब्दसखा" तुषार भुतकर

Thursday, 8 March 2018

माझ्या दृष्टिकोनातून ती स्त्री..

  आपल्या आयुष्यात कोणीना कोणीतरी प्रेरणादायी असत. एखाद्याचा विचार असो या एखादी व्यक्ती.
!मला माझ्या आयुष्यात सर्वात प्रेरणादायी एक स्त्री आहे.
   आपल्या निर्णयात किती ठाम असाव हे एका स्त्रीकडूनच कळत..!आपलं काम किती चोखपणे करायचं हे पण एक स्त्रीकडूनच कळतं..!प्रत्येकात कशा पद्धतीने मिसळून मिळून राहायचं हे एका स्त्रीकडून कळतं;कारण नात काय असत हे ती चांगल्या पद्धतीने जाणते..!कदाचित वाचणार्यापैकी काहींना याविरोधी रूप मिळालं असेल.अच्छा ठिकेय तर त्याच कारण अस तिनी तुम्हाला समजून घेतलेलं असत पण तुम्ही नाही..!मान्य नाही करणार पण हे वास्तविक सत्य आहे दोस्त..!
   जर तुम्ही तिचा आदर केला ना ती तुमचा खूप आदर करते.हे स्त्रीच्या व्यक्तीमत्वाच वैशिष्ट्य आहे.तुम्ही सर्व तुमच्या आईचा,बहिणीचा आदर करतात...बरोबरेय ना..!त्याबदल्यात तुम्हाला आदर मिळतो..मग मला हेच तर सांगायचंय की,प्रत्येक स्त्रीचा आदर करा भले ही तिची वागणूक आपल्या विरोधी असेल.. ती विरोधी जेव्हा वाटेनं तेव्हा तुम्ही तिचा अनादर करतात..!
   हा जर तुम्ही आदर करून,समजून घेऊन बी समोरचा तुमचा अनादर करत असेल ना तिचा आदर करून;तिला तुमची किंमत कळेपर्यंत दूर व्हा..!मन नाही म्हणेन पण तुम्ही थोडं दूर गेले की समोरच्याला महत्व समजेन...पण शेवटी असे सांगावेसे वाटते,आयुष्यात स्त्रीचा खूप आदर करा एक दिवस फार मोठे व्यक्ती बनशाल. जसे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले आणि असे अनेक आहे की ज्यांनी स्त्रीचा आदर केला म्हणून आज इतिहास त्यांचा आदर करतो.आणखी एक स्त्रीची ज्या पुस्तकात विटंबना केली असेल;जसे की ती फक्त कामाची वस्तूय, तिचा फक्त उपयोग करावा(इथं मी काही शब्द बंधन असल्याने लिहू शकत नाही कारण;मला असं वाटतं की मी स्त्रीची विटंबना करेल..) असे पुस्तक पहिल्यांदी फेकून द्या..!स्त्रीच महत्व काय आहे यासाठी मी पुढील एक-दोन वर्षात "तू चुकतीस कुठं..?" पुस्तक लिहायला सुरू कारणारेय.. त्यात आशा पद्धतीने लिहिणार की,ती कधी स्वार्थी नसते अन कधी धोका देत नसते..!आणि महिलादिनाच्या माझ्यातर्फे सर्व आदरणीय स्त्री वर्गाला ही भेट..
धन्यवाद..!©तुषार भुतकर

3 comments:

Ankit said...
This comment has been removed by a blog administrator.
slaher said...

Hello
Tushar jee
मी "आबा" :🙏
खूप छान केलंय blog 👌
लेखहही छानच आहे .....🙏🌹
तुमचं खूप खूप अभिनंदन ... !🌹🙏

"शब्दसखा" Tushar Bhutkar said...

Thank you